आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025,ICC champions trophy 2025.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025,ICC champions trophy 2025.


ICC champions trophy ही एक मोठी टूर्नामेंट आहे चॅम्पियन्स ट्रॉफी ची सुरुवात 1998 साली झाली होती सुरुवातीला त्याला आयसीसी नॉकआउट टूर्नामेंट असे संबोधले जात असे 2002 पासून या लीग चे नाव आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असे ठेवण्यात आले 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी होत असून अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तान आणि युनायटेड अरब इमिरात कडे आहे या लीग मध्ये एकूण आठ टीमचा समावेश आहे.
Group A.                     
  1. भारत                         
  2. बांगलादेश 
  3. न्यूझीलंड 
  4. पाकिस्तान
Group B
  1. अफगाणिस्तान 
  2. ऑस्ट्रेलिया 
  3. इंग्लंड 
  4. दक्षिण आफ्रिका 
या लीगचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान असा होणार आहे हा सामना कराची स्टेडियमवर होणार आहे, भारताचा पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे हा सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचक सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. 

सामन्यांचे ठिकाण 

चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजन यंदा पाकिस्तानात होणार असल्यामुळे भारत वगळून सर्व सामने हे पाकिस्तानातच होणार आहेत पाकिस्तान मधील कराची नॅशनल स्टेडियम,गदाफी स्टेडियम लाहोर व रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे खेळवले जाणार आहेत.

चॅम्पियन्स लीगचे आयोजन यंदा पाकिस्तानात झाल्यामुळे सुरुवातीला भारताची कोंडी झालेली पाहायला मिळाली पण दोन्ही देशांमधील तणाव पाहता भारत विरुद्ध सर्व सामने हे दुबई येथील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर खेळवले जाणार आहेत.


या लीगचा पहिला सेमीफायनल सामना हा 04 मार्च रोजी दुबई येथे होणार आहे तर दुसरा सेमीफायनल सामना हा 05 मार्च रोजी लाहोर येथे होणार आहे आणि अंतिम सामना हा 9 मार्च रोजी लाहोर येथे होणार आहे जर भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तर हा सामना दुबई येथे खेळवला जाईल.


Champions trophy 2025 साठी भारतीय संघ जाहीर 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झालेली आहे या टीम मध्ये एकूण 15 खेळाडूंचा समावेश आहे टीमचा मुख्य कर्णधार म्हणून रोहित शर्मा तर उपकर्णधार म्हणून शुभमन गील ची निवड करण्यात आली आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी जाहीर झालेल्या संघात खालील खेळाडूंचा समावेश आहे
  1. रोहित शर्मा 
  2. शुभमन गिल 
  3. यशस्वी जयस्वाल 
  4. विराट कोहली 
  5. श्रेयस अय्यर 
  6. के एल राहुल 
  7. ऋषभ पंत 
  8. हार्दिक पांड्या 
  9. अक्षर पटेल 
  10. रवींद्र जडेजा 
  11. वॉशिंग्टन सुंदर 
  12. कुलदीप यादव 
  13. जसप्रीत बुमराह 
  14. मोहम्मद शमी 
  15. अर्शदिप सिंह 

वेळापत्रक 

ICC CHAMPIONS TROPHY 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी 2025 रोजी होत असून अंतिम सामना हा 9 मार्च 2025 रोजी होणार आहे

  • १९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
  •  २० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
  •  २१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
  •  २२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  •  २३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
  •  24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  •  २५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  •  २६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  •  २७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  •  २८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  •  १ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
  •  २ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
  •  ४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
  •  ५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  •  ९ मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर

 सर्व सामने पाकिस्तानी वेळेनुसार 14:00 वाजता सुरू होतात उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर सामील होईल पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी 2 मध्ये सामील होईल
 जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाईल

हे पण वाचा:

1036 जागांवर रेल्वेची मेगा भरती,अर्ज सुरू,बातमी सविस्तर/RAILWAY JOBS 2025:

नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार स्मार्टफोन्सची एन्ट्री,SAMSUNG, OPPO, ONE PLUS, XIAOMI आणि POCO लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन्स,NEW SMARTPHONES IN INDIA 2025

2025 मध्ये भारतात लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक कार्स,या कंपन्या लॉन्च करू शकतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स

प्रयागराज महाकुंभ 2025: महाकुंभ 2025 ला सुरुवात 45 दिवस चालणाऱ्या अध्यात्मिक यज्ञात व्हा सहभागी,बातमी सविस्तर 

Comments