मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी आणली मोठी गुंतवणूक, दावोस येथे तब्बल 16 लाख कोटींचे सामंजस्य करार
WEF2025 मध्ये महाराष्ट्राची सरशी तब्बल 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करा
WEF 2025: स्विझरलँड येथील डावोस येथे चालू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद 2025 साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे या परिषदेत भाग घेण्यासाठी दावोस येथे गेले आहेत ही परिषद 20 ते 24 जानेवारी पर्यंत चालणार आहे.
आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रातील कंपन्यांसोबत 15.70 लाख कोटींचे सामंजस्य करार करत ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे ही गुंतवणूक महाराष्ट्रातील विविध विभागांत होणार आहे त्यामुळे विकासाचा समतोल साधला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
गुंतवणुकीची वैशिष्ट्ये
डावोस येथे 15.70 लाख कोटींचे सामंजस्य करार करत ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ घातली आहे ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या सर्व विभागात होणार आहे त्यामुळे विशेष करून मराठवाडा आणि विदर्भ या विभागांना देखील या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.
ही गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये होणार असल्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होणार आहे या गुंतवणुकीमध्ये टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, डेटा सेंटर, स्टील मॅन्युफॅक्चरिंग व EVs मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे 2028-29 पर्यंत महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर इकॉनोमी होण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
RELIANCE आणि JSW ची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक
रिलायन्स इंडस्ट्रीज ने महाराष्ट्रात सरकार सोबत तब्बल 3 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत ज्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 3 लाख नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत ही गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, रिन्यूएबल एनर्जी, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी, रियल इस्टेट आणि इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट या क्षेत्रात होणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री अनंत अंबानी यांचे विशेष आभार मानले आहेत.
तसेच जेएसडब्ल्यू या कंपनीने सुद्धा महाराष्ट्र सरकार सोबत तब्बल 3 लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत ही गुंतवणूक स्टील इंडस्ट्रीज, EV मॅन्युफॅक्चरिंग आणि सोलर इकोसस्टीम मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.
गडचिरोलीवर विशेष लक्ष
दावोस येथे पहिलाच करार गडचिरोली साठी करण्यात आला आहे हा करार कल्याणी समूहासोबत झाला आहे ज्यामध्ये एकूण 5200 कोटींची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये होणार आहे ज्यामधून 4000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत ही गुंतवणूक स्टील इंडस्ट्रीज मध्ये होणार आहे त्यामुळे भविष्यात गडचिरोली हा जिल्हा स्टील सिटी म्हणून ओळखला जाणार आहे.
Comments
Post a Comment