प्रयागराज महाकुंभ 2025: महाकुंभ 2025 ला सुरुवात 45 दिवस चालणाऱ्या अध्यात्मिक यज्ञात व्हा सहभागी,बातमी सविस्तर

महाकुंभ 2025: महाकुंभ 2025 ला सुरुवात,45 दिवस चालणाऱ्या अध्यात्मिक यज्ञात व्हा सहभागी,बातमी सविस्तर 

प्रयागराज: महाकुंभ 2025,13 जानेवारी 2025 ला सुरू होत आहे. हा महाकुंभ मेळा केवळ एक धार्मिक आयोजन नसून ते भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे भारतीय संस्कृतीला जगभरात पोहोचवणारा हा महाकुंभ आहे.

महा कुंभ 2025

कुठे होतोय महाकुंभ:

महाकुंभ 2025 चे आयोजन उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथे होत आहे.येथे गंगा,यमुना आणि पौराणिक सरस्वती नदी चा संगम होतो.प्रयागराज हे भारतातील दुसरे सर्वात प्राचीन शहर आहे प्रयागराज चे हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे चार कुंभ क्षेत्रांपैकी एक प्रयागराज आहे.



किती दिवस चालणार महाकुंभ:

महाकुंभ 2025,13 जानेवारी 2025 ला सुरू होत असून तो 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे या 45 दिवसात 40 कोटी भाविक जगभरातून येथे येणार आहेत तर 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी महास्नान होणार आहे त्या दिवशी चार कोटी भाविक या महास्नानामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा व्यवस्था: 

महाकुंभ 2025 चे आयोजन लक्षात घेता येथे होणारी गर्दी पाहता,येथे 2700 पेक्षा अधिक cctv कॅमेरे,100 पेक्षा अधिक face recognition कॅमेरे,38 हजार पेक्षा जास्त जवान तैनात असणार आहेत त्याचबरोबर 56 पोलीस ठाणे आणि दोन सायबर ठाणे 24 तास सक्रिय राहणार आहेत.

सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे



आयोजन व्यवस्था: 

या महाकुंभ मध्ये जवळजवळ 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे,त्यामुळे या भाविकांसाठी व्यवस्था करणे हे खूप मोठे आव्हान असणार आहे प्रशासनाकडून दीड लाख शौचालय बांधून तयार आहेत.300 पेक्षा अधिक स्नानघरे,दहा हजारांपेक्षा अधिक चेंजिंग रूम,तर तीस पूल
बांधून तयार करण्यात आले आहेत.

दळणवळण व्यवस्था: 

महाकुंभ मेळ्याला जाणार असाल तर आतापासूनच तयारी करा,भाविकांना प्रयागराज पर्यंत पोहोचण्यासाठी खालील व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
  • तीन हजार विशेष ट्रेनच्या 13000 फेऱ्या 
  • प्रयागराज जंक्शन शिवाय आठ विशेष रेल्वे स्थानके तयार 
  • यूपी परिवहन मंडळाच्या 7000 हून अधिक बसेस तैनात 
  • 23 शहरातून थेट विमानसेवा 
  • विदेशी पाहुण्यांसाठी 200 पेक्षा अधिक चार्टर्ड विमान तयार

महाकुंभ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 



एसबीआय मध्ये सुवर्णसंधी! एकूण ६०० जागांवर भरती त्वरित अर्ज करा 
https://www.marathiaddanews.com/2025/01/.html



दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, या नावांचा समावेश, बातमी सविस्तर वाचा




Comments