नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट 2025 मध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेचे मिळणार तीन हप्ते, बातमी सविस्तर वाचा: 
केंद्र सरकार तर्फे राबवली जाणारी शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता आता नवीन वर्षात या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकरी सन्मान निधी ही एक केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६००० रुपये आधार राशी म्हणून जमा केली जाते ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत वितरित केली जाते दरवर्षी या योजनेचे तीन हप्ते जमा केले जातात यावर्षी सुद्धा १९,२०,२१ वा हप्ता वितरित केला जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे या योजनेचा शुभारंभ फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतोय 
https://pmkisan.gov.in/


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार १२००० रुपये:
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुकरण करत राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकार तर्फे प्रति वर्ष सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीमार्फत जमा केले जातात, केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 12 हजार रुपये आधार राशी मिळणार आहे. राज्यातील सव्वा कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होत आहे.
https://nsmny.mahait.org/


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये लवकरात लवकर तुमचे नाव तपासा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक कराhttps://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना:
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

 

Comments