एसबीआय मध्ये सुवर्णसंधी, एकूण 600 जागांवर भरती बातमी सविस्तर वाचा खाली:
SBI recruitment 2025 notification PDF: स्टेट बँक ऑफ इंडिया ने 600 जागांवर प्रोबेबॅशनरी ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे एकूण 600 जागांवर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे बातमी सविस्तर वाचा
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खास संधी आहे, देशाच्या सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ने एकूण 600 जागांवर प्रोबेशनरी ऑफिसर(PO)या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार Sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करू शकतात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाली आहे तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत इच्छुक तरुणांनी त्वरित अर्ज करा
ही भरती प्रक्रिया तीन टप्प्यात होईल:
१. प्राथमिक परीक्षा
२. मुख्य परीक्षा
३. सायको मॅट्रिक चाचणी,समूह चर्चा आणि मुलाखत
उमेदवारांच्या निवडीसाठी मुख्य आणि सायको मॅट्रिक चाचणीतील कामगिरी गृहीत धरली जाईल
अर्ज करण्यासाठी पात्रता:
-उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात स्नातक डिग्री असणे आवश्यक आहे
-अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी देखील पात्र असतील
-उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असावे(एक एप्रिल 2024 पर्यंत) आरक्षित वर्गांसाठी वय मर्यादित सूट आहे
-अर्जुन शुल्क सामान्य,ओबीसी आणि ई डब्ल्यू एस वर्गांसाठी 750 रुपये आहे तर एससी,एसटी आणि पीडब्ल्यूडी वर्गासाठी शुल्क नाही
-अर्ज ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील आणि अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग द्वारे स्वीकारले जाईल
निवड प्रक्रिया:
एसबीआय पीओ निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होते
१. प्राथमिक परीक्षा: ही एक ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा असते
२. मुख्य परीक्षा: यात वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात
३. मुलाखत आणि गटचर्चा: मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या टप्प्यासाठी बोलावले जाते
प्राथमिक परीक्षेचा स्वरूप
•इंग्रजी भाषा: 30 प्रश्न (२० मिनिटे)
•संख्यात्मक योग्यता : 35 प्रश्न (२० मिनिटे)
•तर्क शक्ती क्षमता: 35 प्रश्न (२० मिनिटे)
•एकूण: 100 प्रश्न, 100 गुण,1 तास
मुख्य परीक्षेचा स्वरूप
•वस्तुनिष्ठ परीक्षा (200 गुण): तर्कशक्ती, डेटा विश्लेषण, सामान्य जागरूकता आणि इंग्रजी भाषा यांचा समावेश आहे
•वर्णनात्मक परीक्षा (50 गुण): निबंध आणि पत्र लेखन यांचा समावेश आहे
पगार आणि फायदे
SBI PO ची प्रारंभिक पगार साधारणपणे 41,960 प्रति महिना असते याशिवाय विविध भत्ते जसे की डीए, एच आर ए प्रवास सवलत आणि वैद्यकीय फायदे मिळतात. एकूण वार्षिक पॅकेज आठ ते बारा लाख रुपये पर्यंत असू शकते.
बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या इच्छुक तरुणांनी या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 Sbi.careers
Comments
Post a Comment