राज्यसभा डॉक्टर डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश,नांदेड ते कुंभ नगरी प्रयागराज धावणार विशेष रेल्वे
नांदेड: राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी निवेदन दिले होते त्याचबरोबर त्यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी नांदेड तसेच महाराष्ट्रातून विशेष रेल्वे सोडण्यात याव्यात अशी मागणी केली होती.
खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या या मागणीला यश आले असून नांदेड येथून कुंभनगरी प्रयागराज साठी विशेष रेल्वे सोडण्याचे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे तशी प्रेस नोट दक्षिण मध्य रेल्वेच्या, नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वेळापत्रक
प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील महा कुंभमेळा ला जाण्याकरिता, नांदेड-पटना-नांदेड, औरंगाबाद-पटना- औरंगाबाद, काचीगुडा-पटना-काचिगुडा आणि सिकंदराबाद-पटना-सिकंदराबाद, विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत, या रेल्वेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
Comments
Post a Comment