चायनीज एआय चॅटबोट deepseek ची जगभरात चर्चा
![]() |
https://www.deepseek.com/ |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर काम करत आहेत यात अमेरिकेने सर्वप्रथम हे तंत्रज्ञान विकसित करत यात बाजी मारली आहे, आता चायनाने सुद्धा यात उडी घेत मेड इन चायना AI तंत्रज्ञान विकसित केल आहे.
चीनच्या हाँगझोऊ या शहरातील एका कंपनीने या तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे, या चायनीज कंपनीने deepseek नावाच्या AI chatbot ची निर्मिती केली आहे या कंपनीचे संस्थापक लियान वेनफेंग हे आहेत,
deepseek हे एक AI आधारित तंत्रज्ञान आहे, अमेरिकेनंतर,चायना हे तंत्रज्ञान विकसित करणारा कदाचित दुसराच देश आहे
अमेरिकेला आव्हान
जगभरात सध्या AI च्या क्षेत्रात अमेरिकेचा दबदबा आहे पण आता चायना ने त्यांचं स्वतःचं AI तंत्रज्ञान विकसित करत अमेरिकेला एक मोठा धक्का दिला आहे. चायनीज AI आधारित deepseek हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या Open AI ने तयार केलेल्या chatgpt ला टक्कर देणार आहे त्यामुळे AI च्या क्षेत्रात अमेरिकेचे असलेले वर्चस्व कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतय.
Chatgpt प्रमाणेच तुम्ही deepseek लां काहीही विचारू शकता आणि तुम्हाला अपेक्षित अशी उत्तरे मिळवू शकता.
कमी खर्चात deepseek ची निर्मिती
deepseek ची निर्मिती ही अत्यंत कमी खर्चात केली आहे संशोधकांच्या मते हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी फक्त साठ लाख डॉलर्स इतका खर्च आला आहे हा खर्च इतर देशांनी तयार केलेल्या AI मॉडेल च्या तुलनेत हा खर्च कमी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनीज deepseek AI वरून चिंता व्यक्त केली आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की हा अमेरिकेतील कंपन्यांसाठी एक इशारा आहे आता आपल्याला या क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे, आपल्यासाठी ही गोष्ट सकारात्मक असून कोट्यावधी,अब्जावधी खर्च करण्याऐवजी कमी खर्चात यासारखे तंत्रज्ञान तुम्ही विकसित कराल अशी आम्हाला आशा आहे.
शेअर बाजारावर परिणाम
या तंत्रज्ञानाने अमेरिकन शेअर बाजारात मोठी उलथा पालथ घडवून आणली, एका दिवसात तीन टक्क्यांची घसरण झाली ज्यामुळे पाचशे अब्जाधीशांना करोडो डॉलर्सचा फटका बसला भारतीय शेअर बाजाराला
देखील त्याचे फटके बसले 20 जानेवारीला deepseek लॉन्च झाल्यावर एनविडिया कॉर्पोरेशनचे शेअर्स चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले
हे पण वाचा
उत्तराखंड मध्ये समान नागरिक संहिता लागू,Uniform Civil Code in uttarakhand 2025
रेल्वे भरती 2025, RRB RECRUITMENT 2025, नोटिफिकेशन जारी
Comments
Post a Comment