HMPV, चीन मध्ये नव्या विषाणूचा उद्रेक, जग पुन्हा संकटात|HMPV VIRUS CASES INDIA: नवीन वर्षात पुन्हा एकदा नव्या व्हायरसचा उद्रेक,2019 मध्ये चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोना वायरसने जगभरात थैमान घातले होते या घटनेला पाच वर्ष होताच, चीनमध्ये आणखी एका नव्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे https://www.marathiaddanews.com/
चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हायरस ने डोकं वर काढलय, एचएमपीव्ही (HMPV) असं या व्हायरसचं नाव आहे, या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातलाय बरोबर पाच वर्षान अगोदर चीनच्या वुहान मध्ये अशाच एका वायरस चा उद्रेक झाला आणि पाहता पाहता तो जगभर पसरला आता पुन्हा एकदा चीनमध्ये तशीच काहीतरी परिस्थिती निर्माण झाली असल्याच बोलल जातय.
नेमका हा वायरस काय आहे?
ह्या व्हायरसच पूर्ण नाव ह्युमन मेटान्यूमो वायरस आहे शॉर्ट मध्ये एचएमपीव्ही(HMPV), वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस नवीन नसून यापूर्वी सद्धा तो आपल्याकडे आढळलेला आहे. या व्हायरसची लागण लहान वयोगटातील आणि जेष्ठ नागरिकांना होण्याची शक्यता आहे ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे असे लोक या व्हायरसने संक्रमित होऊ शकतात
- एचएमपीव्ही विषाणू हा एक फ्लू व्हायरस आहे,एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याचा पसराव होतो त्याची लक्षणे ही कोरोना वायरस सारखीच आहेत
- ताप,डोकेदुखी,सर्दी,खोकला
- श्वास घेण्यास त्रास होणे
- घशात खवखव होणे
- थकवा जाणवणे
- शिंका येणे, सुस्ती येणे
एचएमपीव्ही (HMPV) चा भारतात शिरकावं:
एचएमपीव्ही या वायरसची भारतामध्ये एन्ट्री झालेली आहे या वायरसचे तमिळनाडूत दोन,कर्नाटकात दोन,गुजरात मध्ये एक आणि नागपूर मध्ये सुद्धा दोन बालकांना याचा संसर्ग झाला आहे विशेष म्हणजे यातील सर्वजण लहान वयोगटातील आहेत.
काय खबरदारी घ्याल?
चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो वायरसने थैमान घातले आहे भारतात देखील याचे रुग्ण सापडले आहेत पण तज्ञांच्या मते तो नवीन नसून जुनाच व्हायरस आहे तो पूर्वीपासून अस्तित्वात असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे,तरीसुद्धा कोरोना काळात जी खबरदारी घेतली तशीच काही दिवस घ्यावी लागणार जसे की सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे.
हे पण वाचा
1036 जागांवर रेल्वेची मेगा भरती,अर्ज सुरू,बातमी सविस्तर/RAILWAY JOBS 2025:
प्रयागराज महाकुंभ 2025: महाकुंभ 2025 ला सुरुवात 45 दिवस चालणाऱ्या अध्यात्मिक यज्ञात व्हा सहभागी,बातमी सविस्तर
एसबीआय मध्ये सुवर्णसंधी! एकूण ६०० जागांवर भरती त्वरित अर्ज करा
Comments
Post a Comment