उत्तराखंड मध्ये UCC लागू, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची माहिती:देशात गेल्या काही वर्षांत UCC च्या चर्चेने जोर पकडलाय अशातच काही राज्यांनी UCC वर काम सुद्धा सुरू केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून UCC वरून देशात वाद-विवाद सुरू आहे,भारतीय जनता पक्ष UCC च्या समर्थनार्थ आहे तर अन्य विरोधी पक्ष हे UCC च्या विरोधात आहेत, त्यातच आता उत्तराखंड सरकारने राज्यात समान नागरीक संहिता लागू केली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे युसीसी लागू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे
समान नागरिक संहिता: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात आजपासून समान नागरिक संहिता लागू झाल्याचे सांगितले आहे आजचा हा दिवस राज्य आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे आज आपण समानता प्रस्थापित करणाऱ्या विधेयकाला लागू करत आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे त्याचबरोबर या क्षणापासून राज्यात युसीसी पूर्णपणे लागू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे
यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे,मसुदा समितीतील सर्व सदस्यांचे, राज्यातील जनतेचे व देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री यांचे देखील विशेष आभार मानले आहेत. हे सर्व जनतेचे श्रेय आणि आशीर्वाद असून व संविधान निर्मात्यांचा हा सन्मान असल्याचे देखील सांगितले आहे.
UCC मुळे या गोष्टींवर निर्बंध
राज्यात UCC मुळे जाती,धर्म आणि लिंग यावरून होणारा कायदेशीर भेदभाव संपणार आहे,खऱ्या अर्थाने युसीसी मुळे महिला सशक्तिकरण होणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तसेच हलाला, बालविवाह, बहुविवाह आणि तीन तलाक वर संपूर्णपणे निर्बंध असणार आहे
समान नागरिक संहिता हा एक आमच्यासाठी संकल्प असून तो आम्ही आज पूर्ण केला,त्यामुळे 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील एक संकल्प खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास गेला आहे 12 फेब्रुवारी 2022 रोजी आम्ही संकल्प घेतला होता आणि आज तीन वर्षानंतर तो पूर्ण करून दाखवला आहे हे केवळ देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.
UCC मुळे समानता
समान नागरिक संहिता ही कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या विरोधात नसून ती केवळ समाजातील बालविवाह, बहुविवाह, हलाला, तीन तलाक यांसारख्या कुप्रथा मिटवण्यासाठी,समाजात समानता व समरसता आणण्यासाठी आहे आणि महिला सशक्तिकरण करण्यासाठी आहे
UCC मधील महत्त्वपूर्ण नियम
लग्न करण्यासाठी, मुलांसाठी किमान वयोमर्यादा ही 21 तर मुलींसाठी 18 वर्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे त्याचबरोबर पती किंवा पत्नी जिवंत असेपर्यंत दोघांपैकी कोणालाही दुसरा विवाह करता येणार नाही, संपत्तीत मुलींना समान अधिकार मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे ही माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील सांगितले आहे.
सर्व संकल्प पूर्ण
समान नागरिक संहिता लागू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने केलेले सर्व संकल्प आज पूर्ण झाले आहेत असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे भारतीय जनता पक्षाने कलम 370, CAA, तीन तलाक, राम मंदिर आणि आज UCC लागू करून सर्व संकल्प तडीस नेले आहेत यासाठी
त्यांनी प्रधानमंत्री यांचे विशेष आभार देखील मानले आहेत.
येणाऱ्या काळात UCC ची ही गंगा संपूर्ण देशाला प्रेरित करेल आणि संपूर्ण देशभर देखील युसीसी लागू होईल त्याचबरोबर 27 जानेवारी हा दिवस UCC DAY म्हणून साजरा केला जाईल.
हे पण वाचा
रेल्वे भरती 2025, RRB RECRUITMENT 2025, नोटिफिकेशन जारी
AIIMS CRE RECRUITMENT 2025 NOTIFICATION: एम्स मध्ये 4597 पदांसाठी मेगा भरती
Comments
Post a Comment